मोबाईलमध्ये काढलेले फोटो डिलीट न केल्याच्या किरकोळ कारणावरून युवकाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. सदरची धक्कादायक घटना ठाण्यातील कोपरीमधील अष्टविनायक चौक परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणीसह तिच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्वयम परांजपे असे सदर घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ठाण्यातील कोपरीमधील अष्टविनायक चौक परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये घुसून स्वयम याच्यावर कोयत्याने हल्ला करून हत्या केल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली होती.
या घटनेबाबत पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात मृत स्वयम याने त्याच्या मैत्रिणीचे फोटो मोबाईलमध्ये काढले होते. हे फोटो डिलीट करण्यास सांगितले होते.