देवेंद्र फडणवीस : “स्थगिती सरकार गेल्यानंतर गतीचं अन् प्रगतीचं सरकार आलं”….

Photo of author

By Sandhya

देवेंद्र फडणवीस

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पुढच्या महिन्यात म्हणजेच २० नोव्हेंबरला  राज्यात मतदान होणार आहे. काल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

महायुती सरकारने आज गेल्या सव्वा दोन वर्षातील कामांचा लेखाजोखा रिओपर्टकार्डच्या माध्यमातून सादर केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

“आमच्याकरता शंखनाद , काहींसाठी ऐलान ” – केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शंखनाद’ या एका शब्दाने पोस्ट केली होती. राज्यात निवडणुकींचा शंखनाद झालाय, असं त्यांना म्हणायचं होतं.

आजही महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी, “निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींसाठी  ऐलान झाला आहे.”

कामाची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती – “आज या निमित्ताने आमच्या महायुती सरकारने सव्वा दोन वर्षांत जे काही कार्य केलंय त्याचं रिपोर्ट कार्ड ठेवतोय. हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे. स्थगिती सरकार गेल्यानंतर गतीचं आणि प्रगतीचं सरकार आलं.

ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकराने परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या. या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती सांगण्याऱ्या आहेत”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Leave a Comment