महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून जुंपली असून, शरद पवार यांना त्यांच्या मुलीला सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे विधानसभेला उद्धव ठाकरेंना फिरवतील, त्यांची भाषणे होतील.
मात्र, त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पुण्यात केली. पवार यांना शिवसेना- भाजप युती तोडायची होती. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना ते जमले नाही.
त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून ते केले. त्यांना युती तोडण्यात यश मिळाले असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांच्यासाठी आता उद्धव ठाकरे यांची उपयुक्तता संपली आहे.
पवारांना त्यांच्या मुलीला सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे विधानसभेला उद्धव ठाकरेंना फिरवतील, त्यांची भाषणे होतील. मात्र, त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत. उद्धव ठाकरे, संजय राऊत दिल्लीला गेले होते, त्यांना कोणी दाद दिली नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
जागा वाटप जवळपास पूर्ण याप्रसंगी बावनकुळे यांनी महायुतीचे जागा वाटप जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असल्याचे स्पष्ट केले, तसेच पुण्यात आपण इच्छुकांशी चर्चा केली आहे.
त्यांची बाजू समजून घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणे, यात काहीही गैर नाही. कोणी पक्षातील इच्छुक असेल, तर प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांची भेट घेणे, त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे चुकीचे नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.