बच्चू कडू : “एकनाथ शिंदेंना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले”

Photo of author

By Sandhya

बच्चू कडू

महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली हायव्होल्टेज बैठक काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये उशिरा पार पडली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्रि‍पदी कोण विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

तर मुंबईत आज दुपारी वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकीची शक्यता. यामध्ये मंत्रिपदं वाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तावण्यात आली आहे. भाजपच्या गटनेता निवडीनंतर मुख्यमंत्री ठरणार.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर असं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिंदे नेमकी कोणती ऑफर स्वीकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावरच आता बच्चू कडू यांनी भाष्य करत शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.

विधानसभेतील दारूण पराभावानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत तातडीने बैठक घेतली. मुंबईतील वाय. बी.चव्हाण सेंटर येथे ही बैठक त्यांनी घेतली. संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हाप्रमुख आणि उमेदवार यांच्यासह 60 ते 70 लोकांची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा.

त्यांनी चांगला कारभार करावा. शेतकर्‍यांची कर्ज माफीची घोषणा करावी. मला असे वाटते, एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे त्याचे लाडके शेतकरी करता येईल का? लाडका मजूर करता येईल का? लाडका दिव्यांग करता येईल का? हा विचार करावा, असे कडू म्हणाले. ‘एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले,’ असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे हे राज्यातच असतील ते केंद्रात जाणार नाहीत असे मत कडू यांनी व्यक्त केले. भाजपा त्यांना गृहमंत्री पद देणार नाहीत, असे संकेत त्यांनी दिले.

Leave a Comment