हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी विलंबित, सुरुवातीला जनजागृतीला प्रोत्साहन…

Photo of author

By Sandhya

हेल्मेट

दुचाकीस्वार आणि सहप्रवासी अशा दोघांना राज्य सरकारने हेल्मेटसक्ती केली. पण, या आदेशातून पुणे शहराला तूर्त वगळण्यात आले आहे. वाहतुकीबाबतचे विविध प्रशासकीय विभाग, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची चर्चा केली जाईल.

हेल्मेट वापराबाबत जनजागृती केल्यानंतर जानेवारीमध्ये कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या अशा दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना सोमवारी दिले होते. आत्तापर्यंत केवळ विनाहेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती.

आता मात्र सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे. केवळ सहप्रवाशावर कारवाईची तरतूद त्यात केल्याचे महासंचालकांनी म्हटले आहे. या सक्तीला विरोध सुरू झाला आहे.

त्यामुळे विविध घटकांशी चर्चा करून जानेवारीत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी दिली. हेल्मेट वापरणे फायद्याचेच विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

त्यामुळे राज्यात हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर देखील काही दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा, यासाठी आम्ही जनजागृती करण्यावर भर देणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. 

Leave a Comment