आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठीच लढू…. माजी आमदार संजय जगताप 

Photo of author

By Sandhya

सासवड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठीच लढून विधानसभेचा पराभव पुसून टाकू.,

येणारी वर्षे तुमची असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम करणार आहे. पराभव झाला असला तरी जनतेने एक लाखांहून अधिक मतदान करून भक्कम साथ दिली आहे.

यापुढेही सामाजिक कामांच्या माध्यमातून जनतेची कामे करू. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व नेते, कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा पराभव ही आगामी निवडणूकांची नांदी आहे. मला ही निवडणूक जिंकता आली नसली तरी तुम्हाला विजयी करण्याची ताकद माझ्यात आहे. यासाठी आपसातील हेवेदावे बाजूला करून सर्वांनी ताकदीने एकत्र येऊ असे आवाहन पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी केले. 

सासवड येथे गुरूवारी ( दि.५) आयोजित आभार मेळाव्यात माजी आमदार संजय जगताप बोलत होते. ईव्हीएम मशीनबाबत बोलताना ५ टक्के म्हणजे २१ व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्या मोजण्याबाबत निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. ४१३ बुथ पैकी ११७ बुथवर मतांची आघाडी आहे. त्या सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार. आता लबाडांना खड्यासारखे बाजूला करायचे आहे यासाठी सर्वांनी वेळोवेळी माहिती द्यावी. मी आता जरी कमी पडलो असलो तरी यापुढे कमी पडणार नाही. काही झाले तरी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूकांत या ठिकाणी दुसर्‍या कोणालाही निवडून येऊ देणार नाही. आपण स्व. चंदुकाका जगताप यांचे वारसदार असून पराभवाने न खचता लढणे आपल्या रक्तात आहे. त्यामुळे मी खचलो नाही. पुन्हा नव्या उभारीने जनतेत येत आहे.  कोणत्याही निवडणूका अवघड नाहीत.  आपली संस्थात्मक रचना मजबूत असल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केले. 

    यावेळी प्रचारप्रमुख सुदाम इंगळे, माणिक झेंडे, दिनकर हरपळे, नंदकुमार जगताप, बाळासो हरपळे, बाजीराव कुंजीर, कल्याण जेधे, संजय हरपळे, गौरी कुंजीर, सुनील धिवार, राजवर्धिनी जगताप, सुनिता कोलते यांसह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विशाल हरपळे, पी एस मेमाणे, पुर्वाराणी जगताप, हरीदास खेसे, संकेत जाधव, विजय अधिकारी, महादेव टिळेकर, बळवंत गरूड, नाथा कुंभारकर, प्रमोद कारकर, श्रीकांत लक्ष्मीशंकर, सुरेखा ढवळे, संजय टिळेकर, सुरज गदादे, राऊत, धर्माजी गायकवाड, मंजुषा गायकवाड, राजेंद्र जगताप, माणिक चोरमले, अनिल जगताप, मुरलीधर झुरंगे, संदीप जगदाळे आदींनी जनतेच्या मनातील आमदार संजय जगताप हेच असल्याचे सांगत मतदान यंत्राबाबतची शाशंकता, बंडखोर, कमी पडलेले कार्यकर्ते, लाभाच्या योजना, बुथवरील मतदानाचे अवलोकन, तळातील व नवीन कार्यकर्त्यांना बळ आदींबाबत विवेचन करून’लढेंगे..जितेंगे’ च्या घोषणा देण्यात आल्या. प्रदीप पोमण यांनी यांनी प्रास्ताविक केले तर विठ्ठल मोकाशी यांनी आभार मानले.

Leave a Comment