पिंपळवंडी व नागापूर येथील भीषण अपघातात 20 जखमी

Photo of author

By Sandhya


नागापूर

पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी येथे शनिवारी रात्री पिकप ही हायवे वरून खाली उलटल्याची घटना घडली. ही बातमी ताजी असतानाच रविवारी नागापूर थापलिंग च्या पायथ्याला नऊ मॉडेल टेम्पो कामगारांना जनावरासारखे कोंबून व टेम्पो ला सिमेंट मिक्सर भरती करून अतिवेगाने जाणारा टेम्पो कठड्याला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.सदर घटनेत 20 कामगार महिला व पुरुष व चालक जखमी झाले आहेत.

त्या कामगारांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे तसेच इतर किरकोळ जखमी झाले आहेत.
हा अपघात पारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेला असून पुढील तपास पारगाव पोलिस स्टेशन करत आहे.

Leave a Comment