जेजुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगला देशात होत असलेल्या हिंदू धर्मीय नागरिकांना होणाऱ्या जिहादी अत्याचारा विरोधात न्याय मोर्चा काढण्यात आला.
आज दुपारी बारा वाजता जेजुरी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय मोर्चा काढण्यात आला. यावेळी बांगला देशात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच बांगला देशाचा ध्वज यावेळी जाळण्यात आला.
गेली अनेक दिवसांपासून बांगला देशात, हिंदू नागरिकांवर जिहादी अत्याचार होत आहेत,हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत. या अत्याचारा विरोधात भारत सरकारने आवाज उठवावा व बांगला देशात होणारे हिंदू नगरिका वरील अत्याचार थांबवावेत अशी मागणी जेजुरी शहर सकल हिंदू संघटनेचे सूरज दरेकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा पोलीस स्टेशन मध्ये नेवून शासकीय पातळीवर आमच्या मागण्या पोहचविण्याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले. या वेळी जेजुरी शहर सकल हिंदू संघटनेचे सूरज दरेकर,सागर गोडसे,गणेश भोसले,सचिन मोरे,कल्पेश सूर्यवंशी,चंद्रकांत जगताप,सुमित गुरव ,मंगल पवार,गणेश मोरे,शुभम कांबळे,सागर खांडरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.