नायगावमध्ये सात वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याचा क्रूर हल्ला, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

Photo of author

By Sandhya

नायगाव : शेजारच्या नराधमाने सात वर्षाच्या मुलीला मारहाण करत गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

ही घटना नायगाव (तालुका हवेली) येथील आहे. शेजारच्यानेच सात वर्षाच्या मुलीला बेदम मारणहाण करुन गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला असुन मुलीला गटारात फेकून दिले. ही माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन काही तासातच पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (ता. १७ डिसेंबर रोजी) मुलीचे आई-वडील दवाखान्यात गेले होते. मुलगी एकटीच घरी होती. नेहमी प्रमाणे मुलगी चार वाजण्याच्या दरम्यान शेजारी पोल्ट्री फार्म आहे. त्या ठिकाणी मुलांमध्ये खेळण्यासाठी गेली. पण त्या ठिकाणचे मुले गावी गेली होती. त्यावेळी सुखदेव जग्गनाथ शिंदे (वय ३५ वर्ष) रा. पोल्ट्री फार्म नायगाव (ता. हवेली) मुळ गाव बेलदार वाडी, जि चाळीसगाव, त्या ठिकाणी होता. त्याने मुलीला खाण्याचे आमिष दाखवुन राहत्या खोलीत घेऊन गेला. त्याने मुलीला मारहाण करण्यास चालु केले. परिसरात कोणी नसल्याने त्या नराधमाने मुलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मुलीचा गळा रुमालाने आवळला. आणि नंतर शेजारी गटाराचा मोठा खड्डा आहे . त्यात मुलीला फेकून निघून गेला. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मुलगी खड्यातुन बाहेर आली. त्यावेळी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती. आणि पुर्ण चिखलानी भरली होती. घरी आल्यावर घाबरत तीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. आणि नंतर मुलीला कुंजीरवाडीतील सरकारी दवाखान्यात नेहण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पो हवा सुजाता भुजबळ, पो कॉ दिपक यादव, अमोल खांडेकर, राजकुमार भिसे, चौधर, राऊत, लोकल गुन्हे शाखा नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपी सुखदेव जग्गनाथ शिंदे याचे मुले व बायको चार दिवसापूर्वीच गावी गेली होती. त्या टेन्शन मधे दारु पिऊन त्याने हे कृत्य केले असल्याचे उरुळी कांचन पोलीसांनी सागितले. पण यात आरोपीने मुलीला जीवे मारण्याच्या उदेशाने मारहाण का केली असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page