मुंबई येथील ‘गेट वे ऑफ इंडिया’ लगत बुधवारी अरबी समुद्रात एलीफंटा लेण्यांकडे जात असताना फेरी बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन त्या बोटीवरील नियंत्रण सुटले व भीषण अपघात झाला.या अपघातात 13 ठार झाले असून 101 लोकांना वाचविण्यात यश आले आहे, तर अद्याप 7-8 जण बेपत्ता असून नेव्ही व तटरक्षक दलाकडून त्यांचा शोध सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचावदलात समाविष्ट असलेल्या दलांकडून आढावा घेतला असून, मृत नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे