बुधवारी गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा केवस कडे जाणाऱ्या प्रवासी बोटीच्या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये तीन नौदलाचे अधिकारी आणि दहा प्रवाशांचा समावेश होता नौदलाच्या पेट्रोलिंग करणाऱ्या स्पीड बोटन धडक दिल्यामुळे ही पर्यटकांना नेणारी बोट बुडाली आणि ही दुर्घटना घडली आता या प्रकरणात नौदलाच्या बोटी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या भीषण दुर्घटनेनंतर ती स्पीड बोट नौदलानं टो करून नेलेली असून पोलिसांकडून त्या बोटी पाहणी आणि तपासणी सुद्धा करण्यात येते अशी सुद्धा माहितीसमोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नेव्हीच्या स्पीड बोट मध्ये एकूण सहा जण असून त्यामधल्या तिघांचा मृत्यू झालेला असून एक जण गंभीर असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे आता या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा हा 13 वर पोहोचलेला असून दोन जण जखमी तर दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत एकूण 90 पेक्षा जास्त जणांवरती वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आलेत आणि त्यांना घरी सोडण्यात आल्याचं सांगितलं जातंय आता या अपघातात वाचलेल्या अनेक प्रवासी कडन या घटनेचा थरार सांगितला जातोय तर ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या नातेवाईकांकडून शोक हा व्यक्त केला जातोयया अपघातात नेमकी कोणती माहिती समोर आली आहे अपघाताचं कारण नेमकं काय अपघातात चूक नक्की कोणाची प्रवाशांकडून काय सांगण्यात आलंय त्याचीच माहिती या व्हिडिओतनं पाहूयात.
बुधवारी दुपारी साधारण साडेतीन च्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया कडनं एलिफंटाच्या दिशेने नीलकमल या नावाची एक फेरी बोट जात होती या बोटीमधनं जवळपास पास 110 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती मुंबईच्या महानगरपालिकेकडनं देण्यात आली आहे गेटवे ऑफ इंडिया पासून काहीच अंतर पार केल्यानंतर उरण कारंजा इथं ही बोट 3.55 या टाइमिंगच्या सुमारास आली त्याच वेळी समुद्रामध्ये एक स्पीड बोट सुद्धा या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती या स्पीड बोटीमध्ये एकूण सहा जण होते अत्यंत वेगाने ही बोट नीलकमल या बोटीच्या दिशेने धावत आली आणि काही सेकंदात या बोटीनं नीलकमल बोटीला जोरदार धडक दिली बोटीवरचे एक प्रवासी नथराम चौधरी यांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला या धडकेमुळे नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली पाण्याचं प्रमाण हळूहळू वाढू लागल्यानं हळूहळू बोट बुडायला लागली त्यामुळे बोटीतल्या क्रू मेंबर्सनी प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला सांगितलंत्यावेळी अनेक लोक घाबरून गेली होती बोट बुडाल्यानंतर अनेक जण पाण्यात पोहत राहिले तर काही जण जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते या अपघाताची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर लगेचच नौदल जेएनपीटी कोस्टगार्ड येलो गेट पोलीस यांच्या ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली तसेच लोकांना वाचवण्यासाठी 11 क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टर यांची सुद्धा मदत घेण्यात आली दरम्यान या अपघातामध्ये 101 जणांना वाचवण्यात यश आलेलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आता त्यातल्या काही जणांची प्रकृती गंभीर असून दोन जण अद्यापसुद्धा बेपत्ता असल्याची माहिती ही प्रशासनाकडनं दिली जाते आता या अपघातात जे 13 जण दगावलेले आहेत त्यामध्ये सात पुरुष चार महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर येते मृतांच्या नातेवाईकांना सरकार तर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या अपघाताची गंभीर अशी दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर जखमींना ₹50000 रुपयांची आर्थिक मदत ही जाहीर केली आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल वेगवेगळी माहिती सध्या समोरयेते सुरुवात ला नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र परते यांना या बोटीची क्षमता 130 प्रवाशांची वाहून देण्याची असून त्यामध्ये 80 प्रवासी प्रवास करत होते असं सांगितलं होतं पण माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार या बोटीची क्षमता फक्त 80 प्रवाशांची असून त्यामधनं जवळपास 110 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे आता या प्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे असं सुद्धा सांगितलं जातंय तसेच बोटीवरच्या सगळ्या लोकांना आधी लाईव्ह जॅकेट्स देण्यात आली नाहीत ती लाईफ जॅकेट्स उशिरा देण्यात आल्यानं तोपर्यंत बोट बुडाली या अपघातानंतर जवळपास अर्ध्यातासानं बचाव कार्याला सुरुवात झाली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता ज्यांना पोहताही येत नव्हतं त्यांना जलसमाधी मिळाली होती तर अनेक जण बचावासाठी धडपडत होते टाहो फोडत होते असं सुद्धा काही प्रवाशांकडून सांगितलं जातंय दरम्यान ज्या स्पीड बोटच्या धडकेनं हा अपघात झाला ती बोट भारतीय नौदलाची असल्याचं सांगितलं जातंय त्या बोटीत एकूण सहा जण होते नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनं नुसार या स्पीड बोटच्या नव्या इंजिनची टेस्टिंग सुरू होती त्यामुळे ही स्पीड बोट समुद्रामध्ये फिरत होती या बोटीवर दोन नेव्हीचे कर्मचारी तर ओरिजनल इक्विपमेंटमॅन्युफॅक्चरर म्हणजेच ओएम या कंपनीचे कर्मचारी होते त्यांच्याकडनं स्पीड बोटच्या नवीन इंजिनची टेस्टिंग त्यावेळी सुरू होती या स्पीड बोटीचं इंजिन बिघडल्यानं बोट नियंत्रणाच्या बाहेर गेल्याचं नौदलाकडनं सांगण्यात येतंय त्यामुळे बोटीचं नवीन इंजिन निकृष्ट दर्जाचं होतं का याची सुद्धा नौदल आता चौकशी करणार आहे आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय नौदलाने अपघाताच्या दोन वेगवेगळ्या चौकशींचे आदेश दिलेले आहेत या संदर्भात सखोल तपास करण्यासाठी नौदलाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे असं सुद्धा सांगण्यात आलंय दरम्यान मृतांमध्येस्पीड बोटीवरचे नेव्हीचे कर्मचारी महेंद्रसिंग शेखावत यांचा तर ओईएम कंपनीचे कर्मचारी प्रवीण शर्मा आणि मंगेश अशा दोघांचा मृत्यू झालाय तर बोटीवरचा एक जण हा गंभीर जखमी असून दोन जणांवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे तर नीलकमर या प्रवासी बोटीवर असणारे मोहम्मद कुरेशी राकेश अहिरे त्यांच्या पत्नी अक्षता राकेश अहिरे त्यांचा चार वर्षांचा मुलगा निधेश राकेश अहिरे साफियाना पठाण माही पावरा ही तीन वर्षांची मुलगी दीपक अशी मृतांची नाव समोर आली आहे यासोबतच एक महिला आणि दोन पुरुषांची अजून ओळख पटली नसल्याचं सुद्धासांगण्यात येतंय तर दोन जण आणखी बेपत्ता असून त्यांचा सुद्धा शोध घेतला जातोय दरम्यान स्पीड बोटीच्या टेस्टिंगचा नौदलाचा जो दावा आहे तो मात्र बोटीवर वरच्या प्रवाशांकडनं फेटाळला जातोय नेव्हीचे कर्मचारी या स्पीड बोटीतनं स्टंटबाजी करत होते असा आरोप काही प्रवाशांकडून केला जातोय स्पीड बोटीनं आमच्या बोटीभोवती चार ते पाच वेळा घिरट्या मारल्या आणि त्यानंतर आमच्या बोटी जवळून स्पीड बोट वळवताना हा अपघात झालाय त्यामुळे या अपघाताला नेव्हीचे कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप नीलकमल बोटीवरचे प्रवासी श्रावण कुमार यांच्याकडनं करण्यातआलाय दरम्यान या दुर्घटनेमध्ये वाचलेल्या लोकांकडून सुद्धा या घटनेचा सगळा थरार सांगितला जातोय तर काही मृतांच्या वेदनादायी घटना सुद्धा समोर येताना दिसतायत या अपघातात नाशिकच्या अहिरे कुटुंबातल्या एकत्रित तिघांचा मृत्यू झालाय राकेश अहिरे यांना दम्याचा त्रास असल्यानं ते पिंपळगाव वरनं मुंबईला उपचारासाठी आले होते बुधवारी त्यांनी आपली बायको आणि आपल्या मुलाला समुद्र सफारीला ते घेऊन आले आणि त्या दृष्टीने ते नीलकमल बोटीतनं एलिफंटा केवस कडे जात होते पण हा प्रवास अहिरे कुटुंबाचा शेवटचा प्रवास ठरला राकेश अहिरे यांच्यासह त्यांची चीपत्नी अक्षता अहिरे आणि चार वर्षांचा मुलगा निधेश अहिरे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला त्यामुळे नाशिक जिल्ह्यावर सध्या शोककळा पसरली आहे दुसरीकडे या अपघातात वैशाली अडकणे यांनी सुद्धा आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितलाय आमच्या कुटुंबातले आठ जण सुट्टी असल्यामुळे एलिफंटाला फिरायला आलेलो होतो स्पीड बोटीच्या धक्क्यानं आम्ही जागेवरच पडलो स्पीड बोटने टक्कर दिल्यानं आमच्या बोटीला भोक पडलाय असं काही वेळात आमच्या लक्षात आलं तेव्हा आमच्या बोटीचा ड्रायव्हर हा लाईफ जॅकेट घाला असं ओरडायला लागला माझ्या भावाने आम्हा सगळ्यांना लाईफ जॅकेट दिलंते आम्ही घातलं सुद्धा त्यानंतर आमची बोट एका बाजूला कलंडली आणि हळूहळू बुडत गेली काही जण बोटीखाली सापडले तर काही जण वाहत गेले आम्ही बोटीला धरून कसे बसे तरंगत होतो मला काहीही करून माझ्या 14 महिन्यांच्या मुलाला म्हणजे शार्विलला वाचवायचं होतं सुरुवातीला माझ्या भावानं त्याला एका हातानं पाण्याच्या वर उचलून धरलं त्यानंतर त्याला खांद्यावर बसवलं आणि बोटीचा आधार घेऊन तो तरंगत राहिला जवळपास अर्धा तास कोणीही आमच्या मदतीला आलं नाही त्यानंतर सुदैवानं दोन ते तीन बोटी आल्या आणि त्यांनी आम्हाला वाचवलं आणखी पाच दहा मिनिटं उशीर झाला असता तर आम्ही सगळेबुडालो असतो असं वैशाली यांनी या प्रसंगाचं वर्णन केलंय या अपघातात 13 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याने राज्यभरात या सगळ्या प्रसंगावरनं हळहळ आणि संतापही व्यक्त केला जातोय पण या अपघाताबद्दल वेगवेगळे दावे सुद्धा केले जातात एकीकडे नौदलाचा स्पीड बोर्डच्या टेस्टिंगचा दावा आहे पण दुसरीकडे नीलकमलचे प्रवास म्हणतात की स्पीड बोट वरचे अधिकारी हे स्टंटबाजी करत होते पण नीलकमल बोटीमध्ये सुद्धा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते असाही आरोप केला जातोय त्यामुळे या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण हे अजूनही निरुत्तरित असलं तरी ते पुढच्यातपासात समोर येणार आहे तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे नौदलाची ती स्पीड बोट की प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त संख्येने भरलेली नीलकमल बोट याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.