जुन्नर : तालुक्यातील पत्रकार संदीप उतरडे यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या बातमीचा अक्षय बोऱ्हाडे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने पत्रकाराला धमकी देण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा निषेध करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करून उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांना अक्षय बोऱ्हाडे याला कडक कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. सर्वांनी काळ्या फिती लावून बोऱ्हाडे याला अटक करण्याच्या घोषणा देत जुन्नर शहर दणाणून टाकले.