भाजप प्रेरित मनुस्मृतीचे राज्य कधीही काँग्रेस येऊ देणार नाही -अरविंद शिंदे

Photo of author

By Sandhya


फार वर्षांपासून RSS प्रणित भाजपा व त्यांच्या सहयोगी संघटना या देशात मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा अथक प्रयत्न करीत असून त्यांचा हा प्रयत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्य घटना देवून लोकशाही गणराज्य आणल्यामुळे तेव्‍हापासून ते आजतागायत ते डॉ. आंबेडकरांवरती टिका टिपणी व त्यांच्या संविधानाची तोडफोड करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हात घेतला आहे. परंतु सर्व समावेशक राज्य घटनेद्वारे स्थापित हे लोकशाही राज्य जाऊन मनुस्मृतीने प्रेरित राज्य कदापीही येणार नाही व ते कधापीही काँग्रेस होऊ देणार नाही असे उद्‌गार अरविंद शिंदे यांनी काढले. निमित्त होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सन्मान मोर्चाचे आयोजन करण्याच्या सूचनेनुसार आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हाताला काळ्या फिती बांधून केंद्रिय मंत्री अमित शहांचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश पदाधिकारी संजय बालगुडे, नगरसेवक अविनाश बागवे, प्राची दुधाने, विनोद रणपिसे, भिमराव पाटोळे, विठ्ठल गायकवाड, चेतन पडवळ यांनीही आपले मनोगत व्‍यक्त केले.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, अविनाश साळवी, रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, मेहबुब नदाफ, सदानंद शेट्टी, गोपाळ तिवारी, सुनिल शिंदे, सुजित यादव, रवि आरडे, दिपक ओव्‍हाळ, सुमित डांगे, रवि पाटोळे, वाल्मिक जगताप, राज अंबिके, ब्लॉक अध्यक्ष आसिफ शेख, हेमंत राजभोज, रविंद्र माझिरे, राहुल तायडे, संदिप मोकाटे, राजेश मोहिते, लतेंद्र भिंगारे, चेतन पडवळ, नुर शेख, संतोष डोके, अमित कांबळे, उषा राजगुरू, अर्चना शहा, सिमा सांवत, ज्योत परदेशी, रमाकांत साठे, संतोष सुपेकर आदि उपस्थित होते.

आंदोलनात सहभागी झालेल्यांचे आभार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव यांनी मानले.

आंदोलन संपल्यावर डॉ. बाबासाहेब आंबुडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चाने जाऊन निषेधाच्या घोषणा देत अप्पर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Leave a Comment

You cannot copy content of this page