![](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-15-at-17.31.28_c02b4145-1024x525.jpg)
![](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-15-at-17.32.16_328f733b-1024x526.jpg)
नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या निर्भया पथकाने पोलीस स्टेशन हद्दीमधील वारूळवाडी येथील म्युझिक कॅफे व नारायणगाव येथील कॅफे कॅपिटल नावाच्या दोन अवैद्य कॅफेमध्ये शालेय मुले मुली अश्लील चाळे करताना मिळून आल्याने
सदर कॅफे चालकांवर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली आहे.तसेच धनगरवाडी येथील नक्षत्र लॉज रजिस्टर मेंटेन नसल्याच्या कारणावरून लॉज चालकावर नारायणगाव निर्भया पथकाने कारवाई करून नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व लॉजिंग/रिसॉर्ट चालक- मालक यांची नारायणगाव पोलीस स्टेशन येथे काल मीटिंग घेऊन सदर लॉजिंग/रिसॉर्ट चालविताना हॉटेल/लॉजिंग मध्ये कोणताही अवैध व्यवसाय चालणार नाही, अल्पवयीन मुलांना प्रवेश देणार नाहीत, येणाऱ्या प्रत्येक कस्टमरचे रेकॉर्ड मेंटेन करावे, प्रत्येक हॉटेल लॉजमध्ये सीसीटीव्ही बसवावेत अशा प्रकारच्या सूचनांची नोटीस देण्यात आल्या आहेत.
तसेच निर्भया पथकामार्फत नारायणगाव वारूळवाडी परिसरात शाळा व कॉलेज असलेल्या ठिकाणी 225 रोड रोमियोंवरती मोटरवाहन कायद्याअंतर्गत कारवाई करत त्यांच्याकडून 3,17,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नारायणगाव व आजूबाजूच्या नागरिकांना देखील पर जिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या भाडेकरूंची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देण्याबाबत नागरिकांना आव्हान करण्यात आलेले आहे.