
हवेली :– सोमवार दिनांक 20.1.2025 रोजी पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक नृत्य तसेच नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रोहिदासशेठ उंद्रे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, सुभाष (आप्पा) जगताप चेअरमन यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर, सौ पुनम ताई सागर चौधरी अध्यक्षा, पुणे जिल्हा महिला भाजप आघाडी. भाऊसाहेब महाडिक सचिव हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने व नटराज प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथमत: उपस्थित मान्यवरांचे सन्मान पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब (आण्णा) चोरघे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री रामदास (बापू) चौधरी सचिव श्री रंगनाथ (अप्पा) कड, तसेच सर्व विश्वस्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ,व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथक शिवाजी महाराजांवरील गाणी, मोबाईलचे दुष्परिणाम यावर नाटिका,देवीचा जागर तसेच अनेक हिंदी , मराठी चित्रपटातील गीते विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्काराने सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.या वेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप थोपटे, सौ स्वाती वाठारकर, श्री रोहिदास बिचकुले यांनी केले तर आभार श्री विठ्ठल ठोंबरे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक राजीव चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले