हैदराबाद | क्रूरतेचा कळस! सततच्या वादातून पत्नीची हत्या, मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले अन् तलावात फेकून लावली विल्हेवाट

Photo of author

By Sandhya

हैदराबाद : एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले अन् ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून तलावात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या आई-वडिलांनी त्यांच्या बेपत्ता मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरपेट येथील रहिवासी लष्कराचा माजी जवान गुरुमुर्ती असं पतीचं नाव आहे. तर व्यंकटा माधवी (३५) असं पत्नीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला बेपत्ता असल्यामुळे तिला शोधत तिचे कुटुंबीय सासरी पोहचले. त्यावेळी आरोपीने भांडण झाल्यामुळे पत्नी घरातून निघून गेली असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी पती हा आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी सासरच्या लोकांबरोबर पोलीस ठाण्यात गेला होता. पण याप्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पतीची चौकशी केली. अधिकच्या चौकशी दरम्यान आरोपी पतीला पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्याने पत्नीची हत्या केली असल्याचे कबूल केले.

पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की , आम्हा दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. १५ जानेवारी रोजीही आमच्यात भांडण झाले आणि त्यानंतर रागाच्या भरात पत्नी माधवीची हत्या केली. दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले. नंतर हाडे मुसळाने बारीक करून मृतदेहाचे तुकडे तलावात फेकले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मिरपेट भागात घडली आहे. या हत्येतील आरोपी पती हा निवृत्त लष्करी जवान असून, त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर आरोपी डीआरडीओमध्ये आउटसोर्स्ड सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. त्याचे आणि मृत महिलेचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहे. दरम्यान आरोपीने १५ जानेवारी रोजी पत्नीशी झालेल्या भांडणानंतर तिची हत्या केली आणि १६ जानेवारीला मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर १८ जानेवारी रोजी ही क्रूर घटना उघडकीस आली होती.

दरम्यान बुधवारी रात्रीपर्यंत, मीरपेट येथील तलावात पीडितेच्या मृतदेहाचे कोणतेही अवशेष पोलिसांना सापडले नव्हते. त्यामुळे यासाठी पोलिसांनी क्लूज आणि श्वान पथक तैनात केले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page