पंढरपूर | प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंग्याच्या थीमवर फुलांची सजावट

Photo of author

By Sandhya


पंढरपूर :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयन रम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा व नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, कामिनी आदी एक टन फुलांची सजावट करण्यात आली आहे. महत्त्वाचे सण उत्सव, खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. सदरची सजावट पुणे येथील मोरया ग्रुपचे सचिन चव्हाण यांनी सेवाभावी तत्वावर मोफत करून दिली असून, यासाठी शिंदे ब्रदर्स यांचेकडील 15 कारागिरांनी परिश्रम घेतले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केलेली विद्युत रोषणाई व फुलांची सजावटीने भाविक दर्शनरांगेत अधिक गर्दी करीत आहेत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, या जयघोषा बरोबर भारत माता की जय, अशा घोषणा दर्शनरांगेत सुरू आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page