अवसरी बुद्रुकचे कलाशिक्षक संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच ग्रामीण भागात साकारले चित्र व शिल्प प्रदर्शन

Photo of author

By Sandhya


अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील विद्या विकास मंदिर माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात उत्तर पुणे विभागामध्ये ग्रामीण भागात प्रथमच आयोजित कलाविष्कार चित्र आणि शिल्प प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आणि विविध माध्यमातून साकारलेल्या २५० चित्र व शिल्प कलाकृतींचा कलाविष्कार मांडण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ता ठुबे यांचे हस्ते करण्यात आले. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आणि विविध माध्यमातून चित्रे साकारली आहेत.
विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आणि विविध माध्यमातून साकारलेल्या २५० चित्र व शिल्प कलाकृतींचा कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले यात प्रामुख्याने निसर्ग चित्रे, व्यक्ती चित्रे, वस्तू चित्रे याबरोबरच सामाजिक विषयांवरील चित्रे तसेच अमूर्त व आधुनिक शैलीची चित्रे जलरंग, पोस्टर रंग, ॲक्रॅलिक, ऑईल पेस्टल, क्रेऑन या सोबतच तैलचित्र देखील साकारली आहे.
कोरोना नंतर शाळा सुरळीत सुरू झाल्या परंतु मुलांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत पठारावस्था आलेली आहे. मुलांना यातुन बाहेर काढून शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मुलांना रंगांच्या सानिध्यात आणून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विद्यालयाने ग्रामीण भागात अशा प्रकारचा अतिशय स्तुत्य आणि यशस्वी उपक्रम राबविला आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, उपसचिव दिपक चवरे, संचालक अजित वाडेकर, शिवशंभो प्रतिष्ठान ग्रामपंचायत यांचे विशेष योगदान लाभले

Leave a Comment