
चीनची एआय स्टार्टअप कंपनी डीपसीक (Deepseek) अचानक चर्चेचा विषय ठरत आहे. अवघ्या २४ तासात कंपनीने जगाच्या एआय इंडस्ट्रीला हादरवले आहे. त्यामुळे चीप निर्मिती करणाऱ्या जगातील दिग्गज कंपनी एनवीडियाचे तब्बल ६०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.भारतातील एआय कंपन्यांवर ही डीपसीपकचा परिणाम झाला आहे. या डीपसीक कंपनीबद्दल जाणून घेऊया
डीपसीक ही कंपनी चीनची एआय स्टार्टअप आहे. ही कंपनी आपल्या नाविन्यतेकरिता ओळखली जाते. लियांग वेनफेंग हे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या स्टार्टअपने अलीकडेच एआय चॅटबॉट डीपसीक-R1 लाँच केला होता. या चॅटबॉटने या स्टार्टअपने अलीकडेच त्यांचा एआय चॅटबॉट (डीपसीक-आर१) लाँच केला. लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच हा चॅटबॉट बाजारात लोकप्रिय झाला. या ॲपने ओपनएआय आणि चॅटजीपीटीला ही मागे टाकले तसेच अमेरिकेतील ॲपल च्या ॲप स्टोअरवर सर्वाधिक रेटिंग मिळालेले मोफत ॲप बनले.
५२ कोटीत एआय मॉडेलची निर्मिती
लियांग यांनी हे चॅटबॉट मॉडेलची निर्मिती अतिशय कमी खर्चात केली. अवघ्या ६० लाख डॉलर्सपेक्षा कमी (सुमारे ५२ कोटी रुपये) रक्कमेत हा मॉडलची निर्मिती झाली. तर चॅटजीपीटीचा निर्मिती खर्च हा ६ कोटी डॉलरपेक्षाही जास्त होता. गुगलच्या एआय चॅटबॉटच्या निर्मितीकरिताही मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. इतक्या कमी निर्मिती मुल्यामुळे डीपसीकचे मॉडेलची जगभरात चर्चा झाली आहे.
दोन वर्षापूर्वी सुरू केली कंपनी
लियांग यांनी डीपसीक ही कंपनी दोन वर्षापूर्वीच सुरू केली होती. २०२३ मध्ये या कंपनींची स्थापना झाली. या अगोदर लिंयाग यांनी काही कंपन्या सुरू केल्या होत्या. २०१३ मध्ये त्यांनी हांगझोउ याकेबी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि २०१५ मध्ये झेजियांग जिउझांग अॅसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली.त्यांनी २०१९ मध्ये हाय-फ्लायर एआय देखील लाँच केले.
मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण
डीपसीकची लोकप्रियतेचा परिणाम अनेक एआय कंपनीवर होत आहे. यामुळे अमेरिकेची दिग्गज कंपनी एनवीडियाच्या शेअरमध्ये तब्बल १७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतीय एआय कंपन्यांना ही चांगलाच फटका बसला. अनंतराज लिमिटेडचे शेअर २० टक्क्यांनी घसरले, झेन टेक्नॉलॉजीजचे शेअर्स १४ टक्क्यांनी तर नेटवेब टेक्नॉलॉजी इंडियाचे शेअर १० टक्क्यांनी घसरले.
लियांग वेनफेंग यांची संपत्ती
डीपसीकचे संस्थापक हे लियांग वेनफेंग आहेत. त्यांची नेटवर्थ अब्ज रुपयांमध्ये आहे. केमिकल सिटी संकेतस्थळानुसार ४० वर्षाच्या लियांग यांची नेटवर्थ ही ३.२ अब्ज डॉलर्स म्हणजे तब्बल २८ हजार कोटी रुपये आहे. ते आपल्या यशाचे श्रेय हे आपली पत्नी आणि दोन्ही मुलांना देतात.