फडणवीसांनी उत्तर देण्याचे टाळले, धनंजय मुंडे यांच्याबाबतचा निर्णय अजित पवारच घेणार?

Photo of author

By Sandhya

CM Devendra Fadnavis on Dhananjay Munde : गेल्या दोन दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून काहूर उठले आहे. सरकारवर दबाव वाढला आहे. अजितदादांनी धनुभाऊला अभय दिले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गोटातील आमदार, खासदारांनी नैतिकतेच्या मुद्दावर त्यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला आहे. तर केवळ चर्चेवर कारवाईस दादांनी नकार दिला आहे. ठोस पुराव्याशिवाय त्यांनी कोणतीही कारवाई न करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर अजितदादांनी धनुभाऊला अभय दिले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

काय म्हणाले फडणवीस?

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे त्यांच्या कामाने आले होते. मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पण सकाळी कॅबिनेटमध्ये आमची भेट झाली होती. त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खासदारांची लवकरच बैठक

एक बैठक होते. त्या बैठकीला अर्थमंत्री जातात. आपल्या अर्थमंत्र्याने महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत या केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिल्या आहेत. त्याबाबत चर्चाही झाली आहे. खासदारांची बैठक झाली नाही. आम्ही घेणार आहोत. त्या बैठकीचं स्वरुप बदललं आहे. खासदारांनी महाराष्ट्राचे प्रश्न केंद्रात मांडावे यासाठी बैठक होते. अलिकडे खासदार त्यांचेच प्रश्न आमच्यासमोर मांडतात. त्यात काही चूक नाही. पण त्या बैठकीचं स्वरुपच बदललं आहे. त्यामुळे त्या बैठकीचा संबंध अधिवेशनाशी राहिला नाही, असे फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजनेत होणार कारवाई

काही अनियमितता त्यात झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच अनियमिततांची चौकशी करत आहोत. जे सापडेल त्यावर कारवाई करू आणि इतर अपात्र लोकांना यादीतून बाहेर काढू असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment