महाराष्ट्र केसरी 2025: काल अहिल्यानगरमध्ये आयोजित ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तुफान राडा पाहायला मिळाला. वाद इतका टोकाला गेला की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. स्पर्धेतील अंतिम सामना डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात खेळवण्यात आला. पंचानी पृथ्वीराज मोहोळच्या बाजूने निकाल दिला, जो शिवराजला मान्य नव्हता. त्यामुळे त्याची पंचांसोबत बाचाबाची झाली. या वादात शिवजाने पंचाला लाथ मारली.
या राड्यावर आता महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पंचाला गोळ्या घालायला हव्या होत्या, अशा तिव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रहार पाटील यांनी सांगितले की, “शिवराज चुकलाच, पण पंचाला कमी शिक्षा मिळाली. जो प्रकार शिवराजने केला तो चुकीचा होता. मी हे म्हणतो कारण त्या पंचाला थोड्या प्रमाणात शिक्षा मिळाली. शिवराजवर जो अन्याय झाला, त्यामुळे त्याने त्या पंचाला गोळ्या घालायला हव्या होत्या.”
चंद्रहार पाटील यांनी यावर आपले मत व्यक्त करताना म्हटले, “२००९ मध्ये माझ्या सोबतही हेच घडले होते. मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो, पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे मला अन्याय सहन करावा लागला. त्यावेळी आणि आज शिवराजला जो अन्याय झाला, तोच मी सहन केला.”
पंचाच्या निर्णयावर चंद्रहार पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर, त्याने पुढे सांगितले की, “पृथ्वीराज मोहोळच्या बाबतीत काहीच चुकीचे नव्हते. पंचाच्या शिट्टी वाजल्यावर त्याने विजय साजरा करणे अपेक्षित होते. पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला, त्याबद्दल पंचाला कमी शिक्षा मिळाली.”
या प्रकरणी चंद्रहार पाटील यांनी स्पर्धेतील घटनेवर आपला संताप व्यक्त केला आणि त्यानुसार तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली.