
दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले आहे. दिल्लीत ४४ टक्के मतदान झाले आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर काही एक्झिट पोल्स समोर आले. पण त्याचबरोबर सट्टा बाजाराचे अंदाज देखील समोर आले आहे.
दिल्लीत मतदान झाल्यानंतर जवळपास सगळ्या एक्झिट पोलनी यंदा दिल्लीत सरकार बदलणार असा अंदाज वर्तवत आहेत. तर फलोदी सट्टा बाजाराच्या नव्या अंदाजानुसार, दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाच्या जागा कमी होऊ शकतात. मात्र सरकार आम आदमी पक्षाचेच येणार असा अंदाज वर्तवला आहे. एकूणच फलोदी सट्टा बाजारच्या अंदाजानुसार, आम आदमी पक्षाच्या जागा कमी होतील मात्र त्यांचे सरकार स्थापन होईल. तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार, भाजप बहुमत प्राप्त करून सरकार स्थापन करू शकतो. त्यामुळे आता कोणाचे अंदाज खरे ठरणार हे येत्या ८ तारखेलाच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे यंदा काँग्रेस सहा वर्षानंतर भोपळा फोडण्यात यशस्वी होईल, असा अंदाज सगळ्यांनीच वर्तवला आहे. दिल्लीतील ७० जागांसाठी १ कोटी ५६ लाख मतदारांनी कोणाला काैल दिला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
२०२० साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीमध्ये दिल्लीकरांनी ‘आपला’ पुन्हा एकहाती सत्ता दिली होती.त्यावेळी आपचा ६२ जागी विजय झाला होता.तर भाजपला फक्त ८ जागांवरच समाधान मानावे लागले होते.