हिंगोली | राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यक्षपदी सचिन मस्के (नाईक) यांची निवड

Photo of author

By Sandhya


हिंगोली :- सेनगाव तालुक्यातील चिखलाकर येथील रहिवासी असलेले युवा नेते सचिन मस्के नाईक यांची राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बिडी बांगर यांच्या आदेशाने राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष विकी देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

या निवडीबद्दल सचिन मस्के (नाईक) म्हणाले की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे काम हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढवून पक्षाला बळकट करणार आहे व ओबीसी समाजातील घटकांना एकत्र आणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मजबूत करणार आहे व येणाऱ्या काळात ओबीसी जोडो अभियान राबवून गाव तिथे शाखा करणार आहे व ओबीसी समाजाला येणाऱ्या अडीअडचणी सोडून त्यांना न्याय देणार असल्याचे नूतन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मस्के नाईक यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बिडी बांगर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हा सरचिटणीस भिमराव कवडे राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे औंढा तालुका संघटक राहुल पोले विशाल काळे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment