बीड | आरोपांची राळ उडवणाऱ्या धसांनी घेतली मुंडेंची गुप्त भेट; धस तलवार मान्य करणार?

Photo of author

By Sandhya


बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. देशमुख हत्या प्रकरणी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या, धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करणाऱ्या धस यांनीच मुंडे यांची भेट घेतल्याच्या माहितीनं खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दोघांची भेट झाली. ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. एबीपी माझानं खात्रीलायक सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आका, आकाचा आका म्हणत धस यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला लक्ष्य केलं आहे.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड अटक झाली. सध्या तो तुरुंगात आहे. कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे. या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी गेल्या २ महिन्यांपासून सुरु आहे. देशमुख यांचं कुटुंब, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं लावून धरलेली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे मुंडे यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच आता मुंडे आणि धस यांच्या गुप्त भेटीची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment