Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार; कलम ३७० ते अयोध्येतील राम मंदिर निर्माणात बजावलेली भूमिका

Photo of author

By Sandhya



नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. ज्ञानेश कुमार यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. तर विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले ज्ञानेश कुमार हे आता भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त राहणार आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेतील. ज्ञानेश कुमार या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमधील निवडणुकांचे पर्यवेक्षण करणार आहे. राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पॅनेलमधील दोन आयुक्तांपैकी केरळ केडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार हे वरिष्ठ आहेत. पॅनेलचे दुसरे आयुक्त उत्तराखंड केडरचे अधिकारी सुखबीर सिंग संधू आहेत.

आयएलटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केल्यानंतर, ज्ञानेश कुमारने आयसीएएफएल, इंडियामधून बिझनेस फायनान्स आणि अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून पर्यावरणीय अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी केरळ सरकारमध्ये एर्नाकुलमचे सहाय्यक जिल्हाधिकारी, अदूरचे उपजिल्हाधिकारी, केरळ राज्य विकास महामंडळाचे अनुसूचित जाती/जमातीसाठी व्यवस्थापकीय संचालक, कोचीन महामंडळाचे महानगरपालिका आयुक्त, केरळ राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, उद्योग आणि वाणिज्य संचालक, एर्नाकुलमचे जिल्हाधिकाऱ्या, गोश्री बेट विकास प्राधिकरणाचे सचिव, त्रिवेंद्रम विमानतळ विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक, केरळ राज्य परिवहन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आणि नवी दिल्लीतील केरळ हाऊसचे निवासी आयुक्त म्हणून काम केले आहे.

Leave a Comment