आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात
दौंडज जवळ अज्ञात वाहन व दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू.
जेजुरी वार्ताहर दि 23 आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर दौंडज जवळ अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांच्यात अपघात होवून दुचाकी गाडीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक न थांबता निघून गेले असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात अमोल विठ्ठल दगडे वय 38 मूळ गाव दौंडज सध्या राहणार मावडी क प. व दिग्विजय यशवंत कोलते वय 34 रा पिसरवे ता पुरंदर जि पुणे या तरुणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रविवार दि 23 रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरील अमोल दगडे व दिग्विजय कोलते हे दोघे जण दौंडज हून जेजुरी कडे जात होते तर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली. अपघाता नंतर अज्ञात वाहन निघून गेले .या अपघातात दुचाकी वरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघात प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.
आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग विकसित होत असताना शिवरी ते नीरा मार्गावर अनेक अपघात होवून गेली दोन महिन्यात सात ते आठ जणांचा बळी गेला आहे. या महामार्गावर प्रत्येक गावांच्या चौकाचौकात रबलिंग स्पीड ब्रेकर,सिग्नल,झेब्रा क्रॉसिंग पट्टे बसवावेत अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. सतत होणारे अपघात रोहण्यासाठी पर्याय शोधावेत अशी मागणी होत आहे.