स्वारगेट प्रकरण : ‘बलात्कार झालाच नाही’ – आरोपीच्या वकिलांचा दावा

Photo of author

By Sandhya

स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. सुनावणीनंतर आरोपीचे वकील सुमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी माध्यमांसमोर दावा केला की, हा बलात्कार नव्हता, तर दोघांमध्ये पूर्वीपासून ओळख असून हे प्रकरण संमतीचे आहे.

वकिलांनी सांगितले की, दत्ता गाडे आणि संबंधित मुलगी गेल्या महिन्याभरापासून एकमेकांना ओळखत होते. कॉल रेकॉर्ड्स तपासल्यास हे स्पष्ट होईल. दोघे बसमधून एकत्र उतरले आणि सोबत चालत जाताना दिसले. तसेच, सीसीटीव्ही फुटेजमध्येही ती मुलगी आरोपीच्या मागे जात असल्याचे दिसते, त्यामुळे जबरदस्तीचा कोणताही पुरावा नाही. इतकेच नव्हे, तर स्वारगेट पोलिस ठाणे अवघ्या 50 मीटर अंतरावर असताना तिने तक्रार केली नाही आणि नंतर आपल्या गावी निघून गेली.

वकिलांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात पैशावरून वाद झाल्याचे समोर येत आहे आणि दत्ता गाडे पळून गेला नसून तो केवळ आपल्या गावी गेला होता. मात्र, पोलिस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत असून सत्य काय आहे, हे तपासाअंती स्पष्ट होईल. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page