महाकुंभपासून चर्चेत आलेल्या IIT बाबावर हल्ला का? कुठे घडली घटना? आरोप काय?

Photo of author

By Sandhya

महाकुंभ मेळ्यापासून चर्चेत आलेल्या IIT बाबा म्हणजे अभय सिंहने त्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे. नुकतीच त्याने भारत-पाकिस्तान सामन्यावरुन केलेली भविष्यवाणी चुकीची ठरली होती. अभय सिंहने अनेक गंभीर आरोप केले आहेत. कुठे ही घटना घडली?
उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यापासून IIT बाबा चर्चेत आहे. आता या IIT बाबाने न्यूज चॅनलमध्ये डिबेट शो दरम्यान मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. न्यूज डिबेट दरम्यान आपल्यासोबत अपमानास्पद वर्तन करण्यात आलं असा आरोप आयआयटी बाबाने केला. स्थानिक पोलिसांवरही त्याने या प्रकरणात उदासीनता दाखवल्याचा आरोप केलाय. नोएडा सेक्टर 126 येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण त्यांनी दखल घेतली नाही. पोलीस स्टेशनमधून माघारी पाठवलं असा आरोप या आयआयटी बाबाने केला आहे.
“28-02-2025 रोजी एका खासगी न्यूज चॅनलने मला इंटरव्यूसाठी निमंत्रित केलं होतं. इटंरव्यू दरम्यान त्या लोकांनी माझ्यासोबत अपमानास्पद वर्तन केलं. या दरम्यान बाहेरुन काही लोक भगवा वेश धारण करुन न्यूज रुमच्या आत आले. त्यांनी मला मारहाण केली. जबरदस्तीने त्यांनी मला एका खोलीच्या आत बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वामी वेदमूरती नंद सरस्वती नावाच्या भगवे कपडे परिधान केलेल्या व्यक्तीने माझ्यावर काठीने प्रहार केले. या संपूर्ण घटनेच्यावेळी मी माझं इन्स्टाग्राम अकाऊंट चालू ठेवलं होतं” असं या IIT बाबाने म्हटलं आहे.
आयआयटी बाबाच खरं नाव अभय सिंह आहे. मूळचा हरयाणाचा असलेल्या अभय सिंहचे महाकुंभ दरम्यानचे इंटरव्यू व्हायरल झाले. अभय सिंहने आयआयटी मुंबईतून एयरोस्पेस इंजिनिअरींगमध्ये डिग्री मिळवली आहे. त्याच्याकडे कॅनडातील एका मोठ्या पगाराची नोकरी होती. पण त्याने हे सर्व सोडून अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान तो आयआयटी बाबा बनला. खूप प्रसिद्ध मिळाली. अभय सिंह अनेकदा वादातही सापडला. त्याला जूना अखाड्यामधून बाहेर काढण्यात आलं.

Leave a Comment

You cannot copy content of this page