Donald Trump Speech: ट्रम्प यांची मोठी घोषणा! भारताचे नाव घेत म्हणाले, या देशांवर २ एप्रिलपासून कर लादणार…; सिनेटला केले संबोधित

Photo of author

By Sandhya

पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड आक्रमक झाले आहेत. टेरिफ वॉर, इतर देशांना दिली जाणारी मदत रोखणे आणि सरकारी कर्मचारी कपात यामुळे त्यांनी गेल्या ४३ दिवसांत अमेरिकेतच नाही तर जगभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

यामुळे जगभरातील शेअर बाजारही कोसळत आहेत. अशातच आज ट्रम्प यांनी अमेरिकी सिनेटला संबोधित केले. यामध्ये त्यांनी भारतासह अन्य देशांची नावे घेत मोठी घोषणा केली आहे.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज चेंबरमधून सभागृहाला त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आपण गेल्या ४२ दिवसांत अमेरिकेसाठी जे केले ते मागील सरकारने ४ वर्षांत केले नाही असा दावा केला आहे. यापूर्वी त्यांनी २०१७ मध्ये सभागृहाला संबोधित केले होते.

ही मोठी स्वप्ने आणि धाडसी निर्णय घेण्याची वेळ आहे. अमेरिकेला पुन्हा परवडणारा देश बनवायचे आहे. आता आम्ही वोक राहणार नाही. कॅनडा, मेक्सिको, भारत आणि दक्षिण कोरिया सारखे अनेक देश आपल्या उत्पादनांवर मोठे टेरिफ लादतात. आता आम्ही या देशांवर येत्या २ एप्रिलपासून परस्पर कर लादणार आहोत, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.

आमच्याकडून लुटलेले पैसे वसूल करून अमेरिकेतील महागाई कमी केली जाणार आहे. मी अजूनही बायडेन यांच्या अयशस्वी धोरणांना दुरुस्त करण्याचे काम करत आहे. अमेरिकेत आता दोनच जेंडर असणार आहेत. पुरूष आणि स्त्री. मी पुरुषांना महिलांचे खेळ खेळण्यास बंदी घातली आहे. गेल्या ४३ दिवसांत आम्ही खूप काम केले आहे. एक निर्णय घेऊन आधीचे १०० बेकार निर्णय रद्द केले आहेत. आम्ही हास्यास्पद धोरणे रद्द केली आहेत. भ्रष्ट आरोग्य धोरणे देखील रद्द करण्यात आली आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page