
यवत- यवत पोलीस ठाणे हद्दीत यवत रेल्वे स्टेशन येथील निलकंठेश्वर मंदीराजवळ शेतातील एका घरात रात्री 10.45 वा चे सुमारास शशिकांत चव्हाण यांच्या घरात शिरून 3 अज्ञात चड्डी- बनियन घातलेल्या इसमांनी दगड, काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने घरातील 5 पैकी 4 व्यक्ति गंभीर जखमी झाले, पैकी 1 मयत असून उर्वरित 3 अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
यामध्ये अविनाश शशिकांत चव्हाण (वय 34 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. घटना स्थळी श्वान पथक दाखल झाले असून पुढील तपास यवत पोलिस करत आहे.