
बीड:बीड जिल्ह्यातले भाजपाचे दोन नेते आमनेसामने आलेत. पंकजा मुंडे आणि सुरेश धस हा जुना संघर्ष नव्याने उफाळून आलाय. विधानसभेत पंकजा यांनी आष्टीत बंडखोर उमेदवार भीमराव धोंडेंचा प्रचार केल्याचा आरोप धसांनी केला. तर देशमुख प्रकरणात सुरेश धसांनी विनाकारण आपली बदनामी केल्याचं म्हणत पंकजा यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. मुंडे कुटुंबासोबत सोबत कधी जिव्हाळ्याचं तर कधी विरोधाचं नातं ठेवणाऱ्या सुरेश धस यांच्याविरोधात पंकजा मुंडे आक्रमक झाले आहेत.
पंकजा मुंडे आणि सुरेश धस या भाजपाच्याच दोन नेत्यांमधला बेबनाव आता चव्हाट्यावर आला आहे. विधानसभेपासून सुरु असलेली दोन नेत्यांमधली धुसफूस संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळेचं दोन्ही नेते कोणतीही भिडभाड न बाळगता एकमेकांवर जाहीर टीका करताना दिसताहेत. आता हा वाद भाजपा पक्षश्रेष्ठींच्या दरबारात गेलाय. पंकजा मुंडे आणि सुरेश धस दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली आहे.
पंकजा मुंडेंनी नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना गेल्या तीन वर्षात धसांनी कराड गँगविरोधात आवाज का उठवला नाही असा प्रश्न मुलाखतीतून उपस्थित केला होता. सोबतच आपण भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या असूनही धस आपल्यावर थेट आरोप कसे कसे करतात याबदद्ल आक्षेप घेतला. आणि तिथचं पुन्हा वादाची ठिणगी पडली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील राजकारणाचा उल्लेख केला आणि भाजपातील कुरघोडीचं राजकारण उघड झालं.
आता भाजपामधलेच नेते एकमेकांना भिडल्याचं पाहून विरोधकांनीही टीकेची संधी सोडली नाही. बीडमधले भाजपाचे दोन्ही नेते आता जाहीरपणे एकमेकांच्या विरोधात बोलू लागलेत. देशमुखांच्या हत्याप्रकरणामुळे बीड सध्या राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील जिल्हा बनलाय. त्यामुळे या दोन नेत्यांमधला वाद आणि नाराजी भाजप श्रेष्ठी कशी दूर करतात हे पहावं लागे