
पनवेल : मुलीला 29 व्या मजल्या वरील बेडरूमच्या खिडकीतून फेकून आईने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल परिसरात घडला आहे पनवेल येथील पळस्पे परिसरात असणाऱ्या मॅरेथॉन नेक्सन ओरा बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडला आहे. या इमारतीत राहणाऱ्या आशिष दुवा (41)यांच्या पत्नी मैथिली दुवा यांनी मानसिक अवस्था ठीक नसल्याने आपली आठ वर्ष मुलगी माय राहिला घराच्या बेडरूमच्या खिडकीतून 29 व्या माळ्यावरून खाली फेकली व तिचा खून केला त्यानंतर स्वतः देखील 29 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे या अधिक तपास करीत आहेत