
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे. रविवारी भाजपने 3 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. या नेत्याला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली होती. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या यादीला मंजुरी दिली नव्हती.
महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या पाचही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतके संख्याबळ आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा अर्ज आहे. विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या.आमश्या पाडवी यांनी वर्षभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा नंदूरबार-धुळेमधील नेतृत्वाला संधी दिली आहे.