शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत प्रवक्ते जाहीर!

Photo of author

By Sandhya



मुंबई : शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray पक्षाचे अधिकृत प्रवक्ते जाहीर करण्यात आले आहेत. मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि खा. अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना नेते ॲड. अनिल परब, शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, जनसंपर्क प्रमुख ॲड. हर्षल प्रधान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आनंद दुबे, जयश्री शेळके अशा सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी या शिवसैनिकांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेनेच्या Central Office मधून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. याशिवाय सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका ही Uddhav Thackeray यांच्या आदेशानुसार वेळोवेळी मांडत असतात, असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या आधीही शिवसेनेचे हे नेते पक्षाची बाजू मांडत होते. परंतु आज (९ एप्रिल) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पत्रकाद्वारे या नेत्यांना आपले अधिकृत प्रवक्ते जाहीर केले आहे. या प्रवक्त्यांसोबतच अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर हे नेते सुध्दा पक्षाची बाजू नियुक्त केलेल्या प्रवक्त्यांसोबत मांडू शकतात असेही या पत्रकात नमूद केले आहे.

दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा आणि बचत गट चळवळीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या Jayshree Shelke यांच्यावरही शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.Jayshree Shelke या कायद्याच्या पदवीधर असून समाजकारण, राजकारण, कृषी, उद्योग, विधी, बचत गट, महिला, सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशी माहितीही पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. जयश्री शेळके यांची सामाजिक विषयांवर महाराष्ट्रासहित मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली या राज्यांमध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक व्याख्याने झालेली आहेत. त्यामुळे एक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्या परिचित आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page