
पुणे : पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मृत गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक मदत नाकारली आहे. सुशांत भिसे यांनी ही रक्कम नाकारली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आर्थिक मदत भिसे कुटुंबाने नाकारली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मात्र ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे. याआधीही भिसे कुटुंबियांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. पण ती देखील भिसे कुटुंबियांनी नाकारली होती.
पैसे नको, रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा – भिसे कुटुंब
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात येत होते. पण ते भिसे कुटुंबियांनी नाकारले. ही आर्थिक मदत नाकारत त्यांनी आम्हाला पैसे नको, पण दिनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच यापुढे कधीही अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करा अशी विनंतीही गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे.
आर्थिक रक्कम नाकारण्यामागे भिसे कुटुंबाने दिलं कारण
गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची इच्छा दाखवली. एकनाथ शिंदे यांनीही कुटुंबाला ५ लाखांची रक्कम देण्याचं ठरवलं होतं. पण कुटुंबाने ही आर्थिक मदत घेण्यास नकार दिला आहे. आर्थिक मदत नाकारण्यामागे कुटुंबाने कारणही दिलं आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत याची काळजी घ्या. पैसे नको, तर अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा. तसंच आता दिनानाथ रुग्णालयात डॉक्टरांनी राजीनामा दिला असला तरी रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, चुकीच्या डॉक्टर आणि रुग्णालयावर कारवाई करा, अशी मागणी भिसे कुटुंबाने केली आहे.