बारामतीमधील धक्कादायक घटना | “गावच्या यात्रेपूर्वी लग्न कर नाहीतर…” – धमक्यांना कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

Photo of author

By Sandhya



बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून धक्कादाक घटना समोर आली आहे. गावातील तरूणाच्या त्रासाने मुलीने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. आत्महत्या केलेल्या मुलीने आता गेल्या काही दिवसांपूर्वी दहावीची परीक्षा दिली होती. मुलीच्या आई-वडिलांना आरोपीने मारण्याची धमकी दिली होती. गेले अनेक महिने आरोपी हा मुलीला मानसिक त्रास देत होता. घरच्यांना न सांगता मुलीन टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे.तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती.

७ एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०७,७८,२९६,३५२, ३५१ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page