
भोर वेल्हा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित केलय.. येत्या 22 तारखेला मुंबई येथे भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे… आज भोर येथे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पारपडला या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना संग्राम थोपटे यांनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट केलय. मात्र आपला पक्ष सोडण्याचा खापर त्यांनी काँग्रेसवरच फोडलय…. काँग्रेस मधून आपल्याला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता असा आरोप त्यांनी केलाय..