भावनिक नाही तर कायदेशीर लढा … आम्ही तुमच्या सोबत आहे..विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विमानतळ बाधितांना विश्वास

Photo of author

By Sandhya

सासवड : वर्षानुवर्षे कसलेली जमीन एका रात्रीत शासन घेत असेल तर कोणतीही आई जगणार नाही हे पोलीसांनी लक्षात ठेवावे. आईला जमिनीची चिंता होती त्यांच्या जाण्याला सरकार जबाबदार असल्याचे स्पष्ट सांगत आता यापुढे आपण रस्त्यावरची नाही तर कायदेशीर मार्गाने लढाई लढू.
विमानतळाची एकही विट लागणार नाही असे सांगत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ बाधितांना आश्वासित केले.
कुंभारवळण (ता.पुरंदर) येथे शनिवारी (दि.३)ड्रोन सर्वेक्षणाच्या धसक्याने अंजनाबाई कामठे यांचा झालेला मृत्यू व त्यानंतर पोलिस व बाधित शेतकरी यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.४) कुंभारवळण येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मातेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर त्यांनी सात गावांतील बाधीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी आमदार सचिन आहेर, उपनेत्या सुषमा अंधारे, उल्हास शेवाळे, अभिजित जगताप यांसह विमानतळ संघर्ष समितीचे सदस्य आणि मोठ्या प्रमाणात बाधित शेतकरी, महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना दानवे पुढे म्हणाले, पोलिस म्हणतात आम्हाला दगडी मारली. आमची लढाई पोलिसांशी नाही, सरकारशी आहे त्यामुळे पोलिसांनी मध्ये पडू नका. शेतकऱ्यांना गुन्हयात अडकवू नका. भूसंपादन अधिका-यांना धक्का नाही मग पोलीस कोणाची दलाली करत होते. आम्हाला पोलिस ठाण्यात यायला भाग पाडू नका, अन्यथा लढा वेगळ्या दिशेने जाईल., कायदा आमच्यासाठीही आहे, आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही. शेतकऱ्यांना नोटीस नाही, भूसंपादन केले नाही तर आमच्या जमिनीत येता कशाला. आमची शेती म्हणजे आमदार, मंत्री कलेक्टरच्या बापाची आहे का असा प्रश्न उपस्थित करीत दानवे यांनी, शेती न करणा-या मुंबई मध्ये राहीलेल्यांना शेतीचे महत्त्व काय कळणार, शेती म्हणजे आपली काळी आई आहे. त्यामुळे आम्ही आमची इंभरही जमीन देणार नाही. आपल्याला कायदेशीर लढा द्यायचा आहे. आपण ही लढाई लढू आणि जिंकू असा विश्वास दानवे यांनी दिला.
या प्रकल्पामुळे ज्यांचा जीव गेला त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही असा निर्धार करू. शेतीशी मातीशी आपल्याला गद्दारी करायची नाही. आपण लढू, आपली जमीन जाणार नाही, एक इंचही जमीन शासनाला देणार नाही, एकजूट ठेऊ असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले.
यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी आम्ही येथे येण्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी विमानतळ होण्यासाठी ७० टक्के शेतकऱ्यांच्या सह्या असल्याचे सांगितले, मात्र येथे आल्यानंतर संपूर्ण चित्र वेगळे दिसले असून ७ टक्केही शेतकऱ्यांची याला संमती नाही, तर आम्ही पोलीस बंदोबस्त हा मोजणी अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी दिला होता असे सांगितले पण शेतकऱ्यांच्याकडून एकाही मोजणी अधिकाऱ्याला दुखापत झाली नाही, मंग हा लाठीचार्ज कशासाठी करण्यात आला ?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत पोलिसांनी जाणीवपूर्वक दहशत निर्माण केली आहे , कोणताही शासकीय अधिकारी गाडीतून खाली उतरला नव्हता,आम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलो नव्हतो, आमच्या जमिनीवरती आम्ही उभे होतो असे असताना आम्ही शासकीय कामात अडथळा कसा निर्माण केला? आमची लेकरं आमची काळी आई वाचवण्याच्या उद्देशाने आली असताना त्यांच्यावरती खून करण्याचा प्रयत्न केल्याचे खोटे गुन्हे दाखल का केले गेले? आम्ही चोर, दरोडेखोर आहोत का ॽ मंग पोलिस कस्टडी का? आमच्यावरील गुन्हे तातडीने मागे घेतले पाहिजेत , ते उद्या घेतले नाहीत तर आपल्याला आपला मार्ग मोकळा असुन,आपली माता गेली , आमच्या बांधवांना दुखापत झाली, त्यामुळे आता आपणही यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु व याबाबत लवकरच पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन शासनाला उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की पुरंदरला विमानतळाची गरज नाही. इथून पुण्याचे विमानतळ ३६ किमी अंतरावर आहे. आमची इच्छा नसताना आमच्यावर ते लादू नका. विमानतळ करायचेच असेल तर ज्यांना गद्दारी करायला विमानाने वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते, अमित शहा, नरेंद्र मोदींना गुपचूप भेटावे लागते त्यांना विमानतळाची गरज वाटते. त्यामुळे त्यांनी बारामतीला विमानतळ करावे, बारामतीला असलेल्या विमानतळाचे विस्तारीकरण करावे.”

“शिवतारे काही माझे विरोधक नाहीत त्यांना विमानतळ करायचे असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या समोर येऊन चर्चा करावी. शासकीय अधिकारी पंच म्हणून बोलवावेत. शेतकऱ्यांची भूमिका जाणून घ्यावी. मंग समजेल किती शेतकऱ्यांना विमानतळ पाहिजे व याला किती शेतकऱ्यांचा विरोध आहे. दुध का दुध.. पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊद्या.”असे
सुषमा अंधारे सांगितले

Leave a Comment

You cannot copy content of this page