माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 13 मे रोजी जिल्हाधिकारी यांचा सैनिक दरबार

Photo of author

By Sandhya


 
पुणे‍- जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांसाठी 13 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरवार आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता,वीरपिता, वीरपत्नी यांनी आपले अर्ज सैन्य नंवर, पद, नाव, पत्ता, मोबाईल नंबर व स्पष्ट विषयांसह तीन प्रतीमध्ये घेऊन अर्जदार यांनी आपले अर्ज 09 मे 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे जमा करावेत व स्वतः 13 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page