

जेजुरी मोरगाव रस्तावर असणाऱ्या शेतकरी माधव सोनवणे यांच्या उसाच्या शेतात विजेची तार तुटून शॉर्ट सर्किट झाल्याने जेजुरीत सुमारे चार एकर खोडवा ऊस जळाला. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जेजुरी मोरगाव रोड लगत जेजुरीतील माधव सोनवणे यांचा चार एकर खोडवा ऊस आहे. या क्षेत्रावरून विजेची लाईन गेलेली आहे. त्यातील एक तार तुटून उसात पडली आहे. स्पार्किंग झाल्याने उसाला आग लागली. आग नियंत्रणात न आल्याने संपूर्ण ऊस पेटला. या उसाच्या क्षेत्रालगत लोकवस्ती असल्यामुळे जेजुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून असून आग विझावण्यात आली.
आगीत चार महिन्यांचा खोडवा ऊस, उसासाठी करण्यात आलेली पाईप लाईन, तसेच संपूर्ण ड्रीप जळून गेली आहे.