
पुणे: अनुसूचित जातीतील १० वीमध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” राबविण्यात येत आहे.
ही योजना शैक्षणिक वर्ष मार्च २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.
योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना रु. २,००,०००/- (दोन लाख रुपये) इतकी आर्थिक मदत मिळणार असून, पुढील दोन वर्षांसाठी प्रति वर्ष १ लाख रुपये या प्रमाणात अनुदान दिले जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:
📞 ०२०-२६३३५१३५ / ०२०-२६३३५१३९
ही योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे.