कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न कायमचा मार्गी लावू खेडचे आमदार बाबाजी काळे यांचे आश्वासन

Photo of author

By Sandhya

चाकण नगरपरिषद हद्दीतील कचरा खराबवाडी गाव व बिरदवडी परिसरात गेल्या २५ वर्षापासून बेकायदेशीरपणे आणि अनधिकृतरित्या कुठलीही प्रक्रिया व विलगीकरण प्रकिया न राबवता खाजगी जागेत टाकत होते. मात्र या भागातील ग्रामस्थांनी चाकणमधील कचरा याठिकाणी टाकण्यास मज्जाव केल्याने येथील अनधिकृत कचराडेपो बंद झाला आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न कायमचा मार्गी लावू असे ठोस आश्वासन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिले आहे.
चाकण मधील कचरा जागोजागी व घरात सडू लागला आहे.‌ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिक फणफणू लागले आहेत. खराबवाडी हद्दीतील खाजगी जागेतील दगड खाणीत चाकण शहराचा कचरा टाकला जात होता. परंतु जागा मालकाने आपल्या हद्दीत कचरा टाकण्यास चाकण नगरपरिषदेला मज्जाव केल्याने कचऱ्याचे मोठमोठे ढिग साचले होते. प्रशासन, स्थानिक अधिकारी पोलीस यंत्रणा कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या स्थानिक जनतेवर दबाव आणून जन आंदोलन चिरडून कायद्याचा धाक देऊन अरेरावी करत होेते.
आमदार बाबाजी काळे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने बिरदवडी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांना कच-यापासून होणारा त्रास कमी व्हावा यासाठी येथील कचरा डेपो या ठिकाणावरून तातडीने कायमचा हलवण्यात येईल. तसेच त्यासाठी पर्यायी जागा शोधण्यात येईल. यामध्ये कुठलीही टाळाटाळ केली जाणार नाही, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी उद्योजक शैलेश फडके, काळुराम जाधव, संदीप जाधव, अमोल परदेशी, सुनील काळडोके, राहुल जाधव, शुभम पवार आदी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page