भिगवण जवळील डिकसळ येथील विशाल इंटरप्राईजेस कंपनीला आग,जवळपास 50 ते 60 लाखाचा माल जळून खाक

Photo of author

By Sandhya

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा फटका,

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे भिगवण जवळील डिकसळ येथे विशाल इंटरप्राईजेस या अंड्याची साठवणूक करण्यासाठी बनवण्यात येत असलेल्या पेपर स्ट्रेच्या कंपनीला आग लावून जवळपास 50 ते 60 लाखाचं नुकसान झाल आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या वेळेस ही घटना घडली असून शेतकरी कुटुंबातील एका युवकांने अतिशय कष्टाने व जिद्दीने उभारलेली ही कंपनी अक्षरशा जळून खाक झाली आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कंपनीचे पत्रे उडाले पाऊसाचे पाणी कंपनीत घुसून कंपनीत असलेल्या सीसीटीव्ही शॉर्ट सर्किट होऊन स्पोर्ट झाल्याने ही दुर्घटना घडली. की आग एवढी भयानक होती की बारामती ॲग्रो कारखाना कडून बोलवण्यात आलेल्या अग्नीशामक दलाला सुद्धा ही आग आटोक्यात आणता आली नाही‌या घटनेला जवळपास तीन-चार दिवस होऊन सुध्दा प्रशासनाकडुन पाहिजे तेवढी दखल घेतलेली दिसत नाही. ही माहिती सांगताना या कंपनीचे मालक विशाल आबासाहेब हगारे या युवकाच्या डोळ्यात अश्रू आले प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेताना दिसत आहे. शासनाकडून सदर नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पुढे होत आहे.
या संपूर्ण परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनी आढावा घेतला आहे तर पाहूया नक्की कशी घटना घडली ते

Leave a Comment

You cannot copy content of this page