तमन्नाचा सळसळता आणि सुंदर परफॉर्मन्स हा जणू बॉलिवूडच्या डान्सिंग आयकॉन्सना लिहिलेले प्रेमपत्रच!

Photo of author

By Sandhya

भारतीय सिनेमाकडे प्रकाशाचा झोत पुन्हा एकदा वळला असून झी आपल्या मारूती सुझुकी प्रस्तुत 23 वे झी सिने अॅवॉर्ड्‌स 2025 घेऊन येत आहेत. गेल्या वर्षाची परिभाषा करणाऱ्या कथा, सितारे आणि चैतन्याला भव्य आदरांजली ह्या सोहळ्‌यामधून वाहण्यात आली. ह्यावर्षी मंच केवळ सिताऱ्यांसाठी राखीव नसून तो तेवढाच चाहत्यांसाठीही आहे. सर्वांत मोठ्‌या फॅन्टरटेनमेंट नाईट ऑफ दि यर मध्ये ही संध्या स्टारडम आणि फॅनडम यांचा एक अनोखा मिलाफ बनली, जिथे जे सिनेमा बनवतात आणि जे त्याचा आनंद लुटतात असे दोहों एकाच छताखाली आपली जादू दाखवण्यासाठी एकत्र येतात.
ह्या संध्येमधील सर्वांत चर्चेत असलेल्या अॅक्ट्‌सपैकी एक होता तमन्ना भाटियाचा परफॉर्मन्स. तिने भारतीय सिनेमाच्या आयकॉनिक स्त्रियांना अफलातून आदरांजली वाहिली. ऊर्जा, सुबकता, सौंदर्य आणि भाव यांचा सहज मिलाफ असलेल्या ह्या अॅक्टसह तिने सदाबहार गीतांवर एक आकर्षक कॉन्टेम्पररी फ्यूजन आणि मेडली दमदारपणे सादर केली.
कजरा रे, शीला की जवानी, फेव्हिकॉल से, बीडी आणि काला चष्मा अशा चार्ट टॉपर गाण्यांवर थिरकत तिने फूल ऑन फिल्मी आदरांजली यातील सर्व डान्सिंग क्वीन्सना वाहिली. याचसोबत तिने आपले चार्टबस्टर गीत आज की रातसह तमन्नाने मंचावर अगदी सहजपणे नृत्य पेश केले.
तमन्ना भाटिया म्हणाली, “मारूती सुझुकी प्रस्तुत झी सिने अॅवॉर्ड्‌स 2025 मध्ये परफॉर्म करणे माझ्यासाठी खरंच खास होते. आपल्या भारतीय सिनेमाबद्दल जे काही आवडते ते सगळं काही ही संध्या साजरी करते आणि ह्या सगळ्‌या अद्‌भुत महिलांना आदरांजली वाहताना मला अतिशय सन्मानित वाटले. ह्या महिलांनी त्यांच्या सुबकता आणि कलेसह पिढ्‌यांना प्रेरणा दिली आहे. हा अॅक्ट परफेक्ट व्हावा म्हणून मी अनेक तास सराव केला. ती आदरांजली होती आणि मला ह्या अॅक्टला पूर्ण न्याय द्यायचा होता. माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेले आज की रातला लाईव्ह परफॉर्मन्ससाठी रीईमॅजिन करणे आव्हानात्मक आणि कलात्मकदृष्ट्‌या समाधानकारक होते. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझा परफॉर्मन्स तेवढाच आवडेल जेवढा तो करताना मला आला.”

Leave a Comment

You cannot copy content of this page