चारित्र्याच्या संशयाचं भूत डोक्यात शिरलं,तरुणाकडून बायको अन् मुलावर कुऱ्हाडीने सपासप वार महिलेचा जागीच मृत्यू

Photo of author

By Sandhya

पंढरपूरमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथे ही घटना घडली. नवऱ्याने आपल्या बायकोसह दोन मुलांवर कोयत्याने हल्ला केला.

या हल्लयात महिलेचा जागीच मृत्यू झाला. पण झालेल्या झटापटीमध्ये नवरा देखील गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे सोलापूर हादरले आहे. सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायकोच्या हत्येच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरच्या टाकळीमध्ये तानाजी उबाळे हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. तानाजी बायकोच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये नेहमीच कडाक्याचे भांडण होत होते. बुधवारी पहाटे याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. संतापलेल्या तानाजीने आपल्या बायकोवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पल्लवी उबाळे या गंभीर जखमी झाल्या. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हल्ल्यावेळी पल्लवी यांची दोन लहान मुलं त्यांना वाचवण्यासाठी आली तर तानाजीने त्यांच्यावर देखील वार केले. तानाजी हल्ला करत असताना पल्लवीने देखील प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये तानाजी देखील गंभीर जखमी झाला. तानाजी उबाळे आणि त्याची दोन्ही मुलं गंभीर जखमी असून त्यांच्यावर पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पल्लवी उबाळेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page