जेजुरी मोरगाव रोड वर कार व टेम्पोचा भीषण अपघात,  एका महिलेसह आठ ठार, पाच गंभीर जखमी

Photo of author

By Sandhya

दि. १८ जेजुरी मोरगाव रोड वर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्वीफ्ट कारने पीक अप टेम्पोला जोरदार धडक  दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून मोरगाव कडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार ( क्र. एम एच ४२ ए एक्स १०६०) जेजुरीकडून मोरगाव कडे जात असताना श्रीराम ढाब्या समोर पिकअप टेम्पो मधील ( क्र. एम एच १२ एक्स एम  ३६९४ )  साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार  ( क्र.एम एच १२ टी के ९४८३) ला स्वीफ्ट कार जाऊन धडकली. या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर स्वीफ्ट डिझायर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले आहेत. तर  दोन मुले, एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

अपघातात मृतांची नावे 
सोमनाथ रामचंद्र वायसे व रामू संजीवन यादव, दोघेही रा. नाझरे कप,  ता. पुरंदर, अजय कुमार चव्हाण, रा. उत्तरप्रदेश 
अजित अशोक जाधव, रा. कांजळे, ता. भोर जि. पुणे, किरण भारत राऊत, रा. पवारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे, अक्षय शंकर राऊत, रा. झारगडवाडी, ता. इंदापूर जि. पुणे, अश्विनी शंकर ऐसार,  रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर आणि एकाची ओळख पटू शकली नाही. तर जखमींचा नावे अद्याप कळाली नाहीत.

Leave a Comment

You cannot copy content of this page