माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा पहिला दणदणीत विजय

Photo of author

By Sandhya

लोकेशन : माळेगाव

बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहेत. या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत. आता या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे.

या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांच आणि शेतकरी संघटनांच अशी मिळून चार पॅनेल्स मैदिनात आहेत. या कारखान्याचे एकोणीस हजारांहुन अधिक मतदार आहेत.तर निवडणुकीला 88.48 टकक्के मतदान झालं होतं. निवडणूक लढवणाऱ्या नव्वद उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड मतदार आज करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी संघटांचे कष्टकरी शेतकरी पॅनेल अशी चार पॅनेल्स मैदानात आहेत. पहिल्यांदा मतमोजणी झालेल्या ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात होते, तिथे त्यांचा मोठा विजय झाला आहे. ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार सुरवातीपासून आघाडीवर होते. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे.

अ वर्गाची 88.48 टक्के तर ब प्रवर्गात 99.02 टक्के मतदान : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अ वर्गाची 88.48 टक्के मतदान झाले असून यामध्ये 12 हजार 862 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 4 हजार 434 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 19 हजार 549 पैकी एकूण 17 हजार 296 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. तर ब प्रवर्गात 99.02 टक्के मतदान झाले आहे. 102 मतदारांनीपैकी यामध्ये 99 पुरुष आणि 2 स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page