


आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील तरुण भिमाशंकर देवदर्शनावरून परतताना भिमाशंकर मंचर मार्गावरील सुपेधर डिंभे कॉलनी येथील वळणावर मोटारकार व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात धडक इतकी जोरात झाली की यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मंचर तालुका आंबेगाव येथील अभिजित भरत मोरडे हे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे तर जय संजय कांबळे व वडगाव काशिंबेग येथिल तुषार संतोष भैये हे किरकोळ जखमी झाले आहे. हे तीघे मित्र असुन बुधवारी रात्री दुचाकीवरून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून आल्यावर गुरुवारी सकाळी सुपेधर येथील वळणावर निळया रंगाची रेनॉल्ट ट्राइबर क्र. MH 14 JU 9642 या मोटारकार व काळया रंगाची रॉयल एनफील्ड बुलेट क्रमांक MH 12 LR 0909 दुचाकी गाडीचा आपघात झाला. या मध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन अपघात झाल्यानंतर मोटारकार ड्रायव्हर पळुन गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुचाकीवरील अभिजित मोरडे या युवकाचा मृत्यु झाला असुन त्याचे इतर साथीदारांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून पुढील तपास घोडेगाव पोलिस स्टेशनचे रवि सुरकुले करत आहे