
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या नगरीत श्री स्वामीमय सेवा ट्रस्टच्या श्री स्वामी समर्थ मठ व शहरातील श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंदिरात पूजा अभिषेक,पारायण,पालखीची मिरवणूक, अन्नदान ,भजन कीर्तन आदी धार्मिक विधिनी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली.
शहरातील श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंदिरात रुद्राभिषेक,महापूजा,आरती,श्री स्वामी समर्थ चरित्राचे पारायण,भजन,अन्नदान,व श्री स्वामी च्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
तसेच जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठी श्री स्वामी मय ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मठात पहाटे 21 स्वामी भक्त जोडप्यांच्या हस्ते रुद्राभिषेक,महापूजा,महाप्रसाद व अन्नदान आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित या धार्मिक उपक्रमांचे आयोजन श्री स्वामीमय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डिखळे, उपाध्यक्ष माऊली खोमणे कार्यअध्यक्ष गणेश मोरे..संदिप गायकवाड , ज्ञानेश्वर मोरे , गोविंद बेलसरे , निलेश देशपांडे , प्रविण बाबा हेंद्रे यांनी केले.