

pune – डेक्कन जिमखाना भागातील एका प्रसिद्ध कॅफेतील बन मस्कात काचेचे तुकडे आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित केली आहे. काचेचे तुकडे आढळून आल्यानंतर आकाश जलगी यांनी अन्न आणि ओैषध प्रशसन विभागाकडे तक्रार दिली आहे.
आकाश आणि त्यंची पत्नी डेक्कन जिमखाना भागातील एका प्रसिद्ध इराणी कॅफेत आले होते. त्या वेळी त्यांना देण्यात आलेल्या बन मस्कात काचेचे तुकडे होते. आकाश यांना सुरुवातील बनमस्कात बर्फाचे तुकडे चुकून आल्याचे वाटले. त्यांनी बनमस्का नीट पाहिला.
तेव्हा त्यात काचेचे तुकडे आढळून आले. त्यांनी कॅफेतील वेटर आणि मालकांना जाब विचारला. तेव्हा मालकांनी त्यांची माफी मागितली, तसेच त्यांच्याकडून बील घेतले नाही, असे समाजमाध्यात प्रसारित करण्यात आलेल्या चित्रफितीत आकाश यांनी मह्टले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली नाही, असे डेक्कन पोलिसांनी सांगितले.